CRIME NEWS : तळवडे येथे घरफोडी करणारा अटकेत
तीन लाख ६८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
1 min read

तीन लाख ६८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
पिंपरी CRIME NEWS: तळवडे येथील रुपीनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS

या प्रकरणी राकेश बिराजदार (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी सोमवारी (८ जून) फिर्याद दिली असून, मोमिन युसुफ तांबोळी (वय २६, रा. रुपीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा २९ ते ३० मे दरम्यान उघडा असताना आरोपीने घरातील तीन लाख ६८ हजार रुपये किंमतीचे चार तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तपासात मोमिन तांबोळी याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
CRIME NEWS


