Skip to content

CRIME NEWS : मध्यरात्री कृषी साहित्य दुकानासह किराणा दुकान फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : शिरूर तालुक्यातील शिंगाडवाडी येथील शेतकरी मनोहर माने यांच्या मालकीचे 'जय मल्हार ॲग्रो एजन्सी' हे कृषी साहित्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून मोठी चोरी केली.CRIME NEWS

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : मध्यरात्री कृषी साहित्य दुकानासह किराणा दुकान फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: शिरूर तालुक्यातील शिंगाडवाडी येथील शेतकरी मनोहर माने यांच्या मालकीचे 'जय मल्हार ॲग्रो एजन्सी' हे कृषी साहित्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून मोठी चोरी केली.CRIME NEWS

ही घटना पाबळ–शिरूर रोडवरील शास्ताबाद फाटा येथे घडली असून, या चोरीमुळे दुकानमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत कृषी साहित्य व इतर मौल्यवान साहित्य लंपास केले. याचबरोबर शेजारील किराणा मालाचे दुकानही फोडून तेथील साहित्य चोरी करून पोबारा केला. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.CRIME NEWS

विशेष म्हणजे, संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये संशयित चोरट्यांची हालचाल स्पष्टपणे दिसून येत आहे.CRIME NEWS

या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

CRIME NEWS

Share