Skip to content

Crime Newsपॅरोलवर सुटलेला फरार आरोपी ताब्यात

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : छ्त्रपती संभाजीनगर कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, पॅरोलवर सुटलेल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्वेनगर येथून ताब्यात घेतले.

VZ
Vidula Zagade

1 min read

Crime Newsपॅरोलवर सुटलेला फरार आरोपी ताब्यात

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : छ्त्रपती संभाजीनगर कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, पॅरोलवर सुटलेल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्वेनगर येथून ताब्यात घेतले. सुंदर ऊर्फ विलास सतीश गवळी (वय २८, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.Crime News

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे यांना जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेला एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी कर्वेनगर भागात लपून बसला असून तो तिथे वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवले. त्यानुसार त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीसांना संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस पथकाने कर्वेनगर परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपली ओळख सांगत
छ्त्रपती संभाजीनगर कारागृहातून फरार झाल्याचे सांगितले.Crime News

वारजे माळवाडी पोलिसांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड आणि छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाशी संपर्क साधून आरोपीच्या गुन्ह्यांची संपूर्ण खातरजमा केली. यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी नळदुर्ग पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून, पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे, पोलीस हवालदार भुजंग इंगळे, पोलीस शिपाई किशोर नेवसे यांनी केली.

नळदुर्ग पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल

आरोपी सुंदर ऊर्फ विलास गवळी याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे खून आणि खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात ही शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी तो संचित रजेवर (पॅरोल) बाहेर आला होता, परंतु रजेची मुदत संपल्यानंतरही तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता. याबाब नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.Crime News

Crime News

Share