Skip to content

CRIME NEWS : पिंपळे निलख येथे एका महिलेची ५० लाखांची फसवणूक

ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून वेळोवेळी पैसे देण्यास भाग पाडले

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : पिंपळे निलख येथे एका महिलेची ५० लाखांची फसवणूक

ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून वेळोवेळी पैसे देण्यास भाग पाडले

पिंपरी CRIME NEWS : विशालनगर पिंपळे निलख परिसरात एका दाम्पत्याने जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून एका महिलेला वेळोवेळी पैसे देण्यास भाग पाडत मोठी आर्थिक फसवणूक केली. ही घटना १० जानेवारी २०२३ ते ४ जून २०२६ दरम्यान विशालनगर पिंपळे निलख येथे घडली.CRIME NEWS :

या प्रकरणात ४० वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंबरीश जोशी (४३, पिंपळे निलख) आणि ४३ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिला व त्यांच्या कुटुंबाला गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी आरोपींना मोठी रक्कम दिली. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा न देता आणि मूळ रक्कमही परत न करता आरोपींनी एकूण ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS :

Share