Skip to content

CRIME NEWS: नऱ्हेतील बंद फ्लॅट फोडून साडेसहा लाखांचा ऐवज चोरला

बेडरूममधील कपाटातील १३ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गायब

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS: नऱ्हेतील बंद फ्लॅट फोडून साडेसहा लाखांचा ऐवज चोरला

बेडरूममधील कपाटातील १३ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गायब

पुणे CRIME NEWS: नऱ्हे परिसरातील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ६ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात तिघा चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीवरून नऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(३)(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.CRIME NEWS

दि. ४ जून २०२६ रोजी पहाटे २.५५ ते ३.१५ वाजण्याच्या दरम्यान साईशांती अॅव्हेन्यू, सी विंग, फ्लॅट क्रमांक ४०२, इंगळे वस्ती, मराठा हॉटेलजवळ, नऱ्हे येथे ही घटना घडली. फिर्यादी यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी लोखंडी दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील १३ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत. CRIME NEWS

CRIME NEWS

Share