Skip to content

पुण्यात 'सीएनजी'च्या दरात वाढ

cng price hike in pune

DJ
Dattatraya Jadhav

1 min read

cng price hike in pune
cng price hike in pune

मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. देशात प्रिमियम पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. पुणे  शहरात सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

पुण्यात यापूर्वी सीएनजीचा दर 92.50 रुपये प्रति किलो होता. मात्र आता 2 रुपयांनी वाढ होऊन नवा दर 94.50 रुपये प्रति किलो झाला आहे. या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी देखील पुढे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मागील आठवड्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करून ते प्रति लिटर ३ रुपये  केले आहे, तर डिझेलवरील हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.

cng price hike in pune, maharashtra

Share