Skip to content

खुल्या वर्गातील नागरिकांचे वर्गीकरण करा: कवाडे

पीपल्स रिपब्लिकन पार्टीची १५ जुलैपासून राज्यव्यापी सदस्यनोंदणी मोहीम

PG
Prashik Ghaste

1 min read

पीपल्स रिपब्लिकन पार्टीची १५ जुलैपासून राज्यव्यापी सदस्यनोंदणी मोहीम

निलेश राऊत
पुणे: सरकारने अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण न करता खुल्या वर्गातील नागरिकांचे वर्गीकरण करावे. सध्या जनगणना सुरू असून, सरकारने लोकसंख्येच्या आधारावर वर्गीकरण करावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे आणि कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

कवाडे म्हणाले, की पार्टीतर्फे आगामी १५ जुलैपासून राज्यव्यापी सदस्यनोंदणी मोहीम राबविली जाणार असून, याद्वारे ५ लाख नवीन सदस्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या इतर पक्षांतून आमच्याकडे बरेच इन्कमिंग सुरू असून, आम्ही महायुतीसोबत आहोत. आगामी विधानपरिषद निवडणुकीत पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसेच नीट पेपर लीक आणि परीक्षा रद्द होण्याच्या प्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकारने अशा घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Share