Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP चे आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त
Mumbai News : मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने आज, गांधी जयंतीच्या दिवशी, मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
1 min read

Mumbai News : मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने आज, गांधी जयंतीच्या दिवशी, मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनाचे आयोजन केले आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलन करण्यावर CJPचे संस्थापक अभिजीत दीपके ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
CJPकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजासह मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत नेण्याचा इशारा दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याच्या वृत्तानंतर SIR प्रक्रियेवरून राजकीय वादाला अधिक तीव्रता आली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडूनही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CJPच्या आंदोलनावर टीका करत विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News


