शहर काँग्रेसला मिळाले दोन अध्यक्ष
पूर्व भागासाठी प्रशांत जगताप, तर पश्चिमसाठी दीप्ती चवधरी
1 min read

पूर्व भागासाठी प्रशांत जगताप, तर पश्चिमसाठी दीप्ती चवधरी
निलेश राऊत
पुणे: ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पुणे शहरात मोठे फेरबदल करत दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. याशिवाय शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहराची पूर्व आणि पश्चिम अशी दोन भागात विभागणी करून पूर्व भागासाठी प्रशांत जगताप, तर पश्चिम भागासाठी दीप्ती चवधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी गुरुवारी या दोघांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चवधरी यांनी पदभार लगेच स्वीकारला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी हे नियुक्तीचे पत्र दिले आहे.
Photos · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
दोघेही माजी महापौर
नियुक्त केलेल्या दोन्ही शहराध्यक्षांनी महापौरपद भूषवले आहे. चवधरी या विधानपरिषदेच्या आमदारही होत्या. शहर काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन जणांना शहराध्यक्षपद दिले आहे. पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच महिलेचीही निवड करण्यात आली आहे. याआधी संगीता देवकर यांच्याकडे आठ महिन्यांसाठी प्रभारी शहराध्यक्षपद देण्यात आले होते.
पुणे न्यूज


