Pimpari News : आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग
Pimpari News : पिंपरी: आईच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या १३ वर्षीय मुलीला जवळ घेऊन अश्लील कृत्य आणि वक्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
1 min read

Pimpari News : चिंचवड पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
Pimpari News : पिंपरी: आईच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या १३ वर्षीय मुलीला जवळ घेऊन अश्लील कृत्य आणि वक्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिंचवड परिसरात १५ जून २०२६ रोजी ही घटना घडली. पीडित १३ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी १८ ऑगस्ट रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमांतर्गत संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी २०१८ पासून विभक्त राहत असून न्यायालयात घटस्फोटाची मागणी केली आहे. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी विवाहित असून, पीडित १३ वर्षीय मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत असून ती आईसोबत राहत होती. जून महिन्यात ती आईसोबत घरी असताना आईचा एक मित्र तेथे आला. त्याने मुलीला जवळ घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य तसेच अश्लील वक्तव्य केले. या प्रकारामुळे मुलगी अस्वस्थ झाली.https://maharashtramirror.com/ Pimpari News
पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला होता. मात्र, संबंधित आरोपी व्यक्ती माझा मित्र असून त्याच्याबाबत काही बोलू नको, अशा स्वरूपाचे उत्तर आईने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे मुलीने त्यानंतर हा प्रकार आईकडे पुन्हा सांगितला नाही. दरम्यान, जुलैमध्ये पीडित मुलगी वडिलांकडे राहण्यासाठी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.


