Skip to content

Chatrapati Sambhajinager : एक महिन्याचं बाळ विकून आई-वडिलांनी खरेदी केला फोन आणि सोनं

Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : एक महिन्याच्या बाळाची कथित विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशांतून सोन्याचे दागिने आणि दोन ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

एक महिन्याचं बाळ विकून आई-वडिलांनी खरेदी केला फोन आणि सोनं!
एक महिन्याचं बाळ विकून आई-वडिलांनी खरेदी केला फोन आणि सोनं!

Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : एक महिन्याच्या बाळाची कथित विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशांतून सोन्याचे दागिने आणि दोन ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, बाळाच्या आई-वडिलांनी आपल्या बाळाचा १ लाख २० हजार रुपयांना सौदा केल्याचा आरोप असून, अवघ्या ४८ तासांत हे बाळ छत्रपती संभाजीनगरहून नांदेडमार्गे हैदराबादपर्यंत पोहोचलं.https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या आई-वडिलांनी हे बाळ सीमा रेशवाळ हिच्याकडे १ लाख २० हजार रुपयांना दिलं. त्यानंतर सीमा रेशवाळ हिने बाळ संगीता आव्हाड हिला २ लाख ७० हजार रुपयांना दिल्याचं तपासात समोर आलं आहे. पुढे संगीता आव्हाड बाळाला घेऊन नांदेडला गेली. तिथे तिची स्वतःला डॉक्टर सांगणाऱ्या सुरेश गुंटुका याच्याशी भेट झाली आणि बाळाची देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager

यानंतर सुरेश गुंटुका याने हे बाळ त्याची नातेवाईक असलेल्या हैदराबादमधील उमा खटकम हिच्याकडे ३ लाख ५० हजार रुपयांना दिल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सुरुवातीला १ लाख २० हजार रुपयांत झालेला हा कथित व्यवहार पुढे ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचला.
या प्रकरणाचा तपास करताना बाळाच्या आई-वडिलांनी व्यवहारातून मिळालेल्या पैशांपैकी ६२ हजार रुपये खर्च केल्याचं पोलिसांना आढळून आलं. या पैशांतून सोन्याचे दागिने आणि दोन ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान बाळ हैदराबादमध्ये असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने बाळाचा शोध घेत त्याला सुरक्षितपणे छत्रपती संभाजीनगरमध्ये परत आणलं.
या प्रकरणात बाळाच्या आई-वडिलांसह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळाच्या कथित खरेदी-विक्रीच्या या साखळीत प्रत्येकाची नेमकी भूमिका काय होती आणि आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने झाले, याचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलिसांकडून सुरू आहे. बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर बाळाला सुरक्षित संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share