Chatrapati Sambhajinager : १२ कोटींच्या कमिशनसाठी कंत्राटदाराला भरदिवसा लुटले; इनोव्हासह सव्वातीन लाखांची रोकड पळवली
Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : तब्बल १२ कोटी रुपयांच्या कमिशनसाठी दबाव टाकत औद्योगिक कंत्राटदाराला भरदिवसा १० ते १२ जणांच्या टोळीने धमकावून त्याची १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि कारमधील ३ लाख २५ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली.
1 min read

Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : तब्बल १२ कोटी रुपयांच्या कमिशनसाठी दबाव टाकत औद्योगिक कंत्राटदाराला भरदिवसा १० ते १२ जणांच्या टोळीने धमकावून त्याची १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि कारमधील ३ लाख २५ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत हा प्रकार घडला.https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager
या प्रकरणी औद्योगिक कंत्राटदार ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (३४) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सुधीर गोरखनाथ कातकडे (४०) आणि राहुल साहेबराव चाबुकस्वार (४५) यांच्यासह १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे.https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager
१२ कोटींच्या कमिशनसाठी दबाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर बारे हे औद्योगिक कंत्राटदार आहेत. राहुल चाबुकस्वार हा बारे यांच्याकडे १२ कोटी रुपये कमिशन देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बारे यांनी दबावाला बळी पडावे आणि सांगितल्याप्रमाणे वागावे, यासाठी कातकडे आणि चाबुकस्वार यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडवून आणल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
१० ते १२ जणांनी घेरले
३० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता बारे हे चिकलठाणा एमआयडीसीतील महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत आर्किटेक्ट भूषण जोशी यांच्या कार्यालयाजवळ गेले होते. त्यावेळी १० ते १२ जणांनी त्यांना घेरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या टोळीने धमकावून बारे यांच्या ताब्यातील एमएच-२०-एफयू-७००० क्रमांकाची इनोव्हा कार जबरदस्तीने ताब्यात घेतली. कारमध्ये ठेवलेली ३ लाख २५ हजार रुपयांची रोकडही आरोपी घेऊन गेल्याचा आरोप आहे. कारची किंमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
घटनेनंतर या प्रकरणाचा तपास एमआयडीसी सिडको पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. लुटलेली कार आणि रोकड आरोपींनी लपवून ठेवल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


