Skip to content

Pune News : चौफुला-सुपे मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; ३० ते ४० विद्यार्थी जखमी

Pune News पुणे : चौफुला-सुपे मार्गावर आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला भीषण अपघात झाला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

चौफुला-सुपे मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; ३० ते ४० विद्यार्थी जखमी
चौफुला-सुपे मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; ३० ते ४० विद्यार्थी जखमी

Pune News पुणे : चौफुला-सुपे मार्गावर आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला भीषण अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या या बसचा अपघात झाल्याने सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नेहमीप्रमाणे विद्यार्थी एसटी बसने शाळेकडे जात असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी पाटस, चौफुला आणि लोणी काळभोर परिसरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, उपलब्ध माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली विचारपूस

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तसेच विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांना तातडीने तसेच आवश्यक ते सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
तसेच घटनास्थळी आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अपघातामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share