Chandrpur News : दिवाळीचे उत्सव रद्द, शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात
Chandrpur News :चंद्रपूर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
1 min read

Chandrpur News :चंद्रपूर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाची गांभीर्याने दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चंद्रपूर जिल्ह्यात संवेदनशील निर्णय घेतला आहे. यंदाचे नवरात्र आणि दिवाळीचे उत्सव तसेच ‘जय भवानी दांडिया उत्सव’ रद्द करून, त्यावरील खर्चातून वाचणारा निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.https://maharashtramirror.com/ Chandrpur News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांची मदत
दुष्काळ आणि आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रतिनिधी संबंधित कुटुंबीयांच्या घरी जाऊन ही मदत सुपूर्द करणार आहेत.https://maharashtramirror.com/ Chandrpur News
अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आर्थिक आधार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांबरोबरच जिल्ह्यातील सुमारे २० गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मदतीचा हात दिला जाणार आहे. या शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संदीप गिर्हे यांनी दिली.
उत्सवांवरील खर्चाला फाटा; निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, अनेक कुटुंबांवर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. अशा वेळी उत्सव साजरे करण्यापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर यंदा चंद्रपुरात आयोजित करण्यात येणारे नवरात्र, दिवाळी आणि ‘जय भवानी दांडिया उत्सव’ यांसारखे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उत्सवांवर होणारा खर्च वाचवून तो निधी दुष्काळग्रस्त, गरजू आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळवण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे संदीप गिर्हे यांनी स्पष्ट केले.


