Skip to content

Chandrakant Patil : कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघ निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्रावरून नव्या वादाला तोंड

• Gokul Election Result 2026 राज्यातील तीन हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त आणि तज्ज्ञ संचालकांची संख्या वाढवण्याची मागणी; गोकुळच्या अध्यक्षपदाच्या संघर्षात पत्रावरून नव्या राजकीय वादाला तोंड.

V
Vivek

1 min read

Chandrakant Patil : कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघ निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्रावरून नव्या वादाला तोंड

• Gokul Election Result 2026 राज्यातील तीन हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त आणि तज्ज्ञ संचालकांची संख्या वाढवण्याची मागणी; गोकुळच्या अध्यक्षपदाच्या संघर्षात पत्रावरून नव्या राजकीय वादाला तोंड.

पुणे :- कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर आणि सत्तास्थापनेच्या चुरशीदरम्यान राजकारणात नवीन वळण आलेले पाहायला मिळत आहे. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्यात तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या प्रमुख सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त आणि तज्ज्ञ संचालकांची संख्या दोनवरून वाढवून चार करावी, अशी महत्त्वाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी हे पत्र समोर आल्यामुळे यामागच्या उद्देशाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

गोकुळमधील संख्याबळ आणि चंद्रकांत पाटलांच्या पत्राचे गणित

गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी आघाडीने 13 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर महायुतीच्या बाजूने 12 जागा आल्या आहेत. मात्र, बहुमताचा आकडा असूनही अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्यामुळे सत्तासंघर्ष अधिकच वाढला आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थांमधील शासननियुक्त सदस्य वाढवण्याबाबत मागणी केल्यामुळे, जर हे नियम लागू झाल्यास गोकुळच्या एकूण संचालकांची संख्या वाढून वेगळेच राजकीय समीकरण समोर येऊ शकते, अशी चर्चा विरोधकांकडून केली जात आहे.

कायदेशीर लढा आणि उच्च न्यायालयातील सुनावणी

दुसरीकडे, गोकुळच्या अध्यक्ष निवडीची सभा तहकूब करण्याच्या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेत येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या नवीन पत्रामुळे कोल्हापूरचे सहकार व राजकारण चांगलेच तापले असून न्यायालयीन सुनावणीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: New Delhi : दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीची महागर्जना; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 20 विरोधी पक्ष एकवटले

Share