Skip to content

Pune News : चांदणी चौक-भूगाव उड्डाणपूल प्रकल्प अखेर रद्द

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेने चांदणी चौक ते भूगाव दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपूल प्रकल्प अखेर रद्द अनियमिततेच्या आरोपांनंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, फेरनिविदा काढणार
चांदणी चौक-भूगाव उड्डाणपूल प्रकल्प अखेर रद्द अनियमिततेच्या आरोपांनंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, फेरनिविदा काढणार

Pune News : अनियमिततेच्या आरोपांनंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, फेरनिविदा काढणार

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेने चांदणी चौक ते भूगाव दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि फेरबदलांच्या आरोपांनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित विभागाला तातडीने फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

निविदा प्रक्रियेवर विरोधकांचे आक्षेप

काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी या निविदा प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले होते. एका विशिष्ट कंत्राटदाराला अपात्र ठरवून किंवा डावलून मर्जीतील कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्यासाठी निविदेच्या अटी व शर्तींमध्ये हेतूपुरस्सर बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या संदर्भात शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.https://maharashtramirror.com/ Pune News

तसेच, महापालिकेच्या अंदाज समितीने (इस्टिमेट कमिटी) तयार केलेल्या मूळ अंदाजापेक्षा प्रत्यक्ष निविदेची रक्कम तब्बल ४५ कोटी रुपयांनी अधिक असल्याचे निदर्शनास आणून देत, यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन ही कंत्राटबाजी चालल्याचा आरोप करत, संबधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटली होती.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रशासनाची सारवासारव


विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आलेले ४५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचे आरोप महापालिका प्रशासनाने व प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी फेटाळून लावले आहेत. प्रत्यक्षात अंदाजित खर्च आणि निविदा काढलेल्या प्रकल्पाच्या खर्चात ४५ कोटींची नव्हे, तर केवळ दीड कोटी रुपयांचीच तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या अंदाज समितीने डिसेंबर २०२५ मध्ये या प्रकल्पाचा खर्च अंतिम केला होता. त्यानंतरच्या काळात महागाईमुळे बांधकाम साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली. तसेच, मंजूर नकाशे आणि जागेवरील प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीनुसार काळानुरूप कामाच्या स्वरूपात बदल करणे आवश्यक ठरल्यामुळे, प्रकल्पाच्या एकूण अंदाजित खर्चात किरकोळ वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

आता नव्याने निविदा काढणार


निविदेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आणि समान संधीच्या निकषांवर वाद निर्माण झाल्याने, कोणत्याही वादाला जागा ठेवू नये म्हणून आयुक्त नवल किशोर राम यांनी जुनी निविदा पूर्णपणे रद्द केली आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व कायदेशीर बाबी आणि नियमांचे काटेकोर पालन करत आगामी काही दिवसांत नव्याने निविदा मागवण्यात येतील. चांदणी चौक परिसरातील वाढती वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा ६० मीटर रुंद रस्त्यावरील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून फेरनिविदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाण्याची शक्यता आहे.

Share