Skip to content

रावेत मधील क्रेझी लव्हर कॅफे मालकावर गुन्हा दाखल

कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा दिल्यामुळे कारवाई

PG
Prashik Ghaste

1 min read

रावेत मधील क्रेझी लव्हर कॅफे मालकावर गुन्हा दाखल

कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा दिल्यामुळे कारवाई

पिंपरी: रावेत येथील क्रेझी लव्हर्स कॅफेमध्ये कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई सोमवारी (२५ मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

कैलास किसन काशिद (२४, रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल अशोक वाघमारे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लूमिंग डेल अपार्टमेंटमधील कॅफे क्रेझी लव्हर येथे संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, बाहेर केवळ कॉफी बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्या तयार करण्यात आल्याचे दिसून आले. येथे तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Share