Pune Crime : घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी ; भोसरी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बंद घराचा मागील दरवाजा आणि कपाट तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
1 min read

Pune Crime :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बंद घराचा मागील दरवाजा आणि कपाट तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सकाळी आठ ते बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी एकच्या दरम्यान बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली.
याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीचे साडेचार ग्रॅम सोन्याचे आणि २५ तोळे चांदीचे दागिने चोरून नेले.


