Skip to content

भिवंडी : कंपनीमध्ये चोरी, इंगोट मेटल चोरीला, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhiwandi Crime News : वेअरहाऊस मध्ये चोरी, पाच लाखाहून अधिक किंमतीच्या मेटल वस्तू चोरीला..

V
Vivek

1 min read

नारपोली पोलीस

Bhiwandi Crime News : वेअरहाऊस मध्ये चोरी, पाच लाखाहून अधिक किंमतीच्या मेटल वस्तू चोरीला..

भिवंडी :- नारपोली पोलीस ठाण्याच्या (Narpoli Police Station) हद्दीत असलेल्या ओवाळी गावातील एका वेअरहाऊस कंपनीमध्ये (Bhiwandi Ware House burglary) चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये पाच लाखाहून अधिक किंमतीचे मेटल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेबाबत कंपनीच्या सुपरवायझर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Bhiwandi Crime News

22 जून 2024 रोजी, संतोष लच्ची रेड्डी (35 वर्ष) यांच्या अंजुर फाटा, भिवंडी येथील कंपनीच्या वेअरहाऊस मध्ये लोखंडी शटर तोडून चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. कंपनीच्या आतील झिंक इंगोट मेटल दोन बंडल ज्याची किंमत पाच लाख 79 हजार 300 रुपये असुन त्याची चोरी झाली आहे.अज्ञात आरोपींच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेड्डी यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करत आहे. Bhiwandi Crime News

हेही वाचा: Dombivli Crime News : शिपिंग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक

Share