Thane News : भिवंडीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 6 लाख 50 हजारांची लाच स्वीकारताना कारिवलीचे सरपंच अटकेत!'
Thane News :ठाणे,(भिवंडी) :- भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय परशुराम नाईक (वय 62) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 6 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
1 min read

Thane News : तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरण कामाच्या मोबदल्यात मागितली होती लाच; ठाणे एसीबीची धडक कारवाई'
Thane News :ठाणे,(भिवंडी) :- भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय परशुराम नाईक (वय 62) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 6 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराच्या मालकीच्या फर्ममार्फत कारिवली गावातील तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू होते. या कामाच्या शासनाकडून मंजूर असलेल्या निधीपैकी 10 टक्के निधी ग्रामपंचायतीमार्फत मिळणे आणि त्यासंदर्भातील इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरपंच संजय नाईक यांनी तक्रारदाराकडे 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.https://maharashtramirror.com/ Thane News
तडजोडीनंतर 6.50 लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले
तक्रारदाराची ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने 10 ऑक्टोबर 2026 रोजी पंचांसमक्ष पंचांग कार्यालय आणि कारिवली गावात पडताळणी करण्यात आली असता, सरपंच संजय नाईक यांनी 6 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून आरोपी संजय नाईक यांना त्यांच्या खाजगी कार्यालयातून लाचेची पहिली रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एसीबीचे मार्गदर्शक आवाहन
या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (संशोधन 2018) नुसार कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिरे आणि भगत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद अहिर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


