Skip to content

भाईंदर : गुटख्‍याची अवैध पद्धतीने वाहतूक; आरोपीला अटक

Bhayandar Police Seized Gutkha : गुटख्‍याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एकाला भाईंदर पोलिसांनी अटक केली,आरोपीकडून 59 हजार 840 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

V
Vivek

1 min read

Bhayandar Police Seized Gutkha

Bhayandar Police Seized Gutkha : गुटख्‍याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एकाला भाईंदर पोलिसांनी अटक केली,आरोपीकडून 59 हजार 840 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

भाईंदर :- गुटख्‍याची अवैध illegal tobacco Smugglings पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एकाला भाईंदर पोलिसांनी अटक केली. दिवसाढवळ्या पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Mira Bhayandar Police आरोपीकडून 59 हजार 840 रुपयांचा गुटखा जप्‍त करण्‍यात आला आहे. Mira Bhayandar Latest Crime News

विशाल कुमार सामईप्रसाद गौतम ( रा. भोलानगर, भाईंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा वाहतूक होणार असल्याबाबतची माहिती बीट मार्शल-1 यांचे पोलिस अंमलदार विशाल भोई यांना गोपनीय बातमी मिळाली होती. भोई यांनी आपल्या वरिष्ठांना अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पंच आणि पथक यांनी बॉम्बे मार्केट येथे सापळा रचून आरोपी विशालकुमार गौतम याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील 59 हजार 840 रुपयाचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे. पोलिसांनी विशाल कुमार याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रतिबंधक केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची हेरगिरी प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात Bhayandar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादवि 123,223,274,अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम 23,26(2),26(2),(4),30 (2) (अ),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. Mira Bhayandar Latest Crime News

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 01 मिरारोड, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, विवेक सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईदर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली आनंद काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विशाल भोई, संकेत गोवारी यांनी केली आहे. Mira Bhayandar Latest Crime News

हेही वाचा: Thane Fraud News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक : ऑनलाइन टास्क देऊन 2.62 लाखांची फसवणूक

हेही वाचा: मिरा रोड : कार चोरी करणाऱ्या तरुणाला पकडण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश, आरोपीकडून चार कार हस्तगत

Share