Pune News : भारती सहकारी बँकेचा १२ टक्के लाभांश जाहीर; व्यवसाय २,७९० कोटींच्या पुढे
Pune News : पुणे: भारती सहकारी बँकेच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना यंदाही १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.
1 min read

Pune News : पुणे: भारती सहकारी बँकेच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना यंदाही १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने आर्थिक कामगिरीत वाढ नोंदवत एकूण २,७९०.१२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. अहवालानुसार बँकेला या आर्थिक वर्षात २३.२९ कोटी रुपयांचा ढोबळ नफा, तर १४.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. विशेष म्हणजे बँकेने निव्वळ एनपीए शून्य टक्के राखल्याचे सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
सभासदांना सलग दुसऱ्या वर्षी १२ टक्के लाभांश देण्याची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येत असून मोबाईल बँकिंग आणि यूपीआय सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच अंबक आणि शिवडी शाखांचे आधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले आहे.
भारती सहकारी बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँक असून सर्वसामान्य ग्राहकांना कर्जपुरवठा आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


