Pimpri Crime : बावधन बुद्रुक येथे व्यापाऱ्याची ३० लाखांची ऑनलाईन फसवणूक
Pimpri Crime : पिंपरी: व्हॉट्सॲपवर व्हर्च्युअल मेसेज पाठवून व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
1 min read

Pimpri Crime : बिजनेस पार्टनर असल्याचे भासवून पैसे ट्रान्सफर करायला लावले
Pimpri Crime : पिंपरी: व्हॉट्सॲपवर व्हर्च्युअल मेसेज पाठवून व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (२३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिलीप प्रल्हाद चौहान (४२, रा. बावधन बुद्रुक) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri Crime
आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये विनापरवानगी प्रवेश करून व्हॉट्सॲपवर फिर्यादीचा बिजनेस पार्टनर बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यावरून ३० लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास लावून फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


