Skip to content

Pune Crime : बारामतीत घरावर दरोडा, वृद्धेसह दोन महिलांची निर्घृण हत्या ; सहा लाखांचे दागिने लांबवले

Pune Crime :पुणे: बारामती तालुक्यातील शेरेचीवाडी येथे एक घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

बारामतीत घरावर दरोडा, वृद्धेसह दोन महिलांची निर्घृण हत्या सहा लाखांचे दागिने लांबवले
बारामतीत घरावर दरोडा, वृद्धेसह दोन महिलांची निर्घृण हत्या सहा लाखांचे दागिने लांबवले


Pune Crime :पुणे: बारामती तालुक्यातील शेरेचीवाडी येथे एक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात जबरदस्तीने घुसून अज्ञात चोरट्यांनी दोन ज्येष्ठ महिलांची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली आणि अंगावरील सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण बारामती परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime :

इंदुमती मारूती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५, दोन्ही रा. शेरेचीवाडी, ता. बारामती) अशी खून झालेल्या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश मारूती लडकत (वय ४५, मूळ रा. शेरेचीवाडी, सध्या रा. बारामती) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर घरासमोर झोपलेल्या इंदुमती लडकत यांच्या अंगावरील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण (किंमत ४ लाख ८० हजार रुपये) आणि चुलत वहिणी कृष्णाबाई लडकत यांच्या अंगावरील एक तोळ्याचे गंठण (किंमत १ लाख २० हजार रुपये) असा एकूण सहा लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरला. चोरीच्या या प्रयत्नादरम्यान आरोपींनी दोन्ही महिलांच्या मान व गळ्यावर धारदार हत्याराने गंभीर वार करून त्यांचा जागीच खून केला आणि पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share