Pune News : बारामतीत जानाई देवी मंदिरात चोरी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : बारामती तालुक्यातील कटफळ येथील जानाई देवी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप आणि कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी चांदीचे मखर, मुकुट आणि हार असा एकूण नऊ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
1 min read

Pune News : गाभाऱ्याचे कुलूप तोडून सात किलो चांदीचे मखर, मुकुट आणि हार लंपास
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : बारामती तालुक्यातील कटफळ येथील जानाई देवी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप आणि कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी चांदीचे मखर, मुकुट आणि हार असा एकूण नऊ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. १ नोव्हेंबरच्या रात्री ते २ नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
कटफळ येथील जानाई देवी मंदिरात पुजारी म्हणून काम करणारे देविदास बवन गुरव (वय ४१, रा. कटफळ, ता. बारामती) यांनी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या आतील दोन्ही गाभाऱ्यांचे कडी-कोयंडे आणि कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला.https://maharashtramirror.com/ Pune News
चोरट्यांनी गाभाऱ्यातील सात किलो वजनाचे चांदीचे मखर, देवीच्या डोक्यावरील पाव किलो वजनाचा चांदीचा मुकुट आणि गळ्यातील पाव किलो वजनाचा चांदीचा हार चोरून नेला. या चोरीप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.


