Skip to content

Pune News : बारामतीत सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास सूर्यनगरीत बंद फ्लॅट फोडून चोरट्यांचा डल्ला

Pune News : पुणे: दुपारच्या वेळी घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल ७ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

बारामतीत सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास सूर्यनगरीत बंद फ्लॅट फोडून चोरट्यांचा डल्ला
बारामतीत सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास सूर्यनगरीत बंद फ्लॅट फोडून चोरट्यांचा डल्ला

Pune News : पुणे: दुपारच्या वेळी घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल ७ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात घडली. ही घटना सोमवारी (दि. ५) दुपारी घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

सूर्यनगरी लेन क्रमांक ३ येथील इंद्रायणी अपार्टमेंटमधील रूम क्रमांक ६ मध्ये संध्यादेवी राजाराम जाधव (वय ४३) या वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी त्या कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.https://maharashtramirror.com/ Pune News

जाधव घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सव्वासात लाखांचा ऐवज चोरीला
चोरट्याने २ लाख २५ हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र, १ लाख ३५ हजार रुपयांचे मिनी गंठण, ९० हजार रुपयांची सोन्याची साखळी व बदामी पेंडंट, १ लाख ३५ हजार रुपयांचे दोन जोड झुबे व टॉप्स, ४५ हजार रुपयांच्या सोन्याच्या वेली आणि ७५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी संध्यादेवी जाधव यांच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रामहरी भोसले करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share