Skip to content

Auckland News : अर्शदीप सिंग १५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

Auckland News :ऑकलंड : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

अर्शदीप सिंग १५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
अर्शदीप सिंग १५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

Auckland News : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात मिचेल सँटनरला बाद करत अर्शदीपने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नोंदवला विक्रम

Auckland News :ऑकलंड : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याला बाद करत अर्शदीपने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा गाठला. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.https://maharashtramirror.com/ Auckland News

न्यूझीलंडच्या डावातील १९व्या षटकात अर्शदीपने सँटनरला बाद केले आणि आपल्या १५०व्या आंतरराष्ट्रीय टी-२० बळीची नोंद केली. या कामगिरीसह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० बळी घेणाऱ्या जगातील गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारा नववा गोलंदाज ठरला.

अर्शदीपने या सामन्यात चार षटकांत ३८ धावा देत एक बळी घेतला. त्याच्या या वैयक्तिक विक्रमासोबतच न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ९ बाद १७२ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडने सामना ८७ धावांनी जिंकला. भारताने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यामुळे मालिकेत आघाडी कायम ठेवली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share