Skip to content

Amol kolhe : ४८ तासांनंतरही खासदार कोल्हे घटनास्थळापासून दूरच

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 min read

Amol kolhe

Amol kolhe : संसदेत रयतेची भाषा, मतदारसंघात मात्र… मोशी दुर्घटनेकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठ

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर

Amol kolhe : मोशी येथील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पात हजारो टन कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आठ मराठी आणि परप्रांतीय कामगार अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहेत. एनडीआरएफ आणि प्रशासकीय पथके ४८ तासांपासून रात्रंदिवस ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. घटनास्थळावर कामगारांच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असताना, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र या गंभीर दुर्घटनेकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दुर्घटना घडून दोन दिवस उलटले, तरीही खासदार कोल्हे यांनी घटनास्थळाला साधी भेट न दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Amol kolhe not visited moshi building collapse)

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

या गंभीर अनुपस्थितीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळातून आणि प्रामुख्याने सोशल मीडियावरून खासदार कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली जात असून, त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या संवेदनशीलतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Amol kolhe

moshi building collapse

मोशी कचरा डेपो परिसर हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुख-दुःखात धावून येणे ही स्थानिक खासदारांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, ४८ तास उलटूनही डॉ. अमोल कोल्हे यांनी फिरकूनही न पाहिल्याने सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. Amol kolhe

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीतील पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

"संसदेत भाषणांच्या तोफा डागणारे आणि पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारून रयतेच्या हिताच्या गप्पा मारणारे अमोल कोल्हे प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या मतदारसंघातील रयत ढिगाऱ्याखाली गाडली जात असताना कुठे गायब आहेत?" असा टोकदार सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 'रील लाईफ विरुद्ध रिअल लाईफ' अशा शब्दांत नागरिकांनी खासदारांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे. Amol kolhe

"निवडणुका आल्या की मतदारांच्या दारात येऊन मते मागणारे खासदार आता एवढी मोठी जीवितहानी झालेली असताना कुठल्या दौऱ्यात व्यस्त आहेत? स्वतःच्या हक्काच्या माणसांचे प्राण कंठाशी आलेले असताना खासदारांना मतदारसंघातील जनतेपेक्षा इतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात?" असा घणाघाती आरोप विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.

दुर्घटनेची पार्श्वभूमी

बुधवारी (८ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास हजारो टन कचऱ्याचा डोंगर 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत दुमजली इमारत पूर्णपणे मलब्याखाली गाडली गेली. सुरुवातीला इमारतीत २३ कामगार अडकल्याची माहिती समोर आली. त्यापैकी पाच जण स्वतः बाहेर पडले, तर बचाव पथकांनी आणखी नऊ जणांना जिवंत बाहेर काढले. एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, आठ जणांचा अद्याप शोध सुरू आहे. Amol kolhe

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

सुरक्षा व्यवस्थेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कचऱ्याचा प्रचंड ढीग आणि प्रशासकीय इमारत यांच्यात आवश्यक सुरक्षित अंतर ठेवले होते का, संरक्षण भिंत पुरेशी होती का, तसेच कार्यालय व कॅन्टीन सुरक्षित ठिकाणी उभारता आले नसते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका

याशिवाय, दुर्घटनेनंतर अडकलेल्या कामगारांच्या संख्येबाबतही प्रशासनाकडून परस्परविरोधी आकडे देण्यात आले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी १६, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी २०, तर मंत्री गिरीश महाजन यांनी २३ कामगार अडकल्याचे सांगितले. स्वतःच्या प्रकल्पात किती कर्मचारी उपस्थित आहेत, याची अचूक माहिती महापालिकेकडे नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे वास्तविक आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न झाला का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. Amol kolhe

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share