Skip to content

Pune News : पुण्यात राजकीय वादंग, भाजप आक्रमक

Pune News पुणे, धनश्री ओतारी : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

VK
Vikrant Kulkarni

3 min read

पुण्यात राजकीय वादंग, भाजप आक्रमक सरकारी महाविद्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो अमित ठाकरेंच्या सांगण्यावरून काढला; गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी
पुण्यात राजकीय वादंग, भाजप आक्रमक सरकारी महाविद्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो अमित ठाकरेंच्या सांगण्यावरून काढला; गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Pune News : सरकारी महाविद्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो अमित ठाकरेंच्या सांगण्यावरून काढला; गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Pune News पुणे, धनश्री ओतारी : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रा शेजारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी हा फोटो खाली उतरवला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून, पुण्यातील राजकारणाला आता भाजप विरुद्ध मनसे असे नवे वळण लागले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दिली भेट
अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी महाविद्यालयातील कँटिनमधील जेवणाचा दर्जा आणि क्रीडा कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक उपलब्ध नसण्याबाबत मुख्याध्यापकांना धारेवर धरले. याच वेळी मुख्याध्यापकांच्या कक्षात उभे असताना एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले की, महापुरुषांच्या छायाचित्रांच्या अगदी बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
यावर तीव्र आक्षेप घेत अमित ठाकरे यांनी, "छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याचे औचित्य काय?" असा सवाल मुख्याध्यापकांना केला. त्यानंतर तत्काळ मनसे कार्यकर्त्यांनी तो फोटो भिंतीवरून खाली उतरवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

कृतीचे केले जोरदार समर्थन
या प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी आपल्या कृतीचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी तो फोटो काढायला सांगितला. नरेंद्र मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेवू नका. त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी कधीच होऊ शकत नाही. शासकीय कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, तर तो लावा पण तो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांच्या बाजूला चालणार नाही. भाजप नेत्यांना आमचा हा विरोध खटकत असेल, तर त्यांनी आधी जनतेला सांगावे की त्यांना शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? उद्या तुम्ही देवघरातही मोदींचा फोटो लावाल का? आम्ही छत्रपती महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही." अशी आक्रमक भूमिका यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली.https://maharashtramirror.com/ Pune News

भाजपकडून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमित ठाकरेंच्या या कृतीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. भाजपचे नेते नवनाथ बन यांनी अमित ठाकरेंवर कठोर कारवाईची मागणी करत म्हटले आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचे काम अमित ठाकरे यांनी केले आहे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकारी कार्यालयांमध्ये एक निश्चित प्रोटोकॉल असतो. तो फोटो काढण्यापूर्वी अमित ठाकरेंनी तो प्रोटोकॉल वाचायला हवा होता. ते मनसेचे नवीन नेते आहेत आणि घरात बसणाऱ्यांना शासकीय प्रोटोकॉलची कोणतीही माहिती नसते." https://maharashtramirror.com/ Pune News

याच मुद्द्यावर पुणे महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "तो फोटो कुठल्या एका व्यक्तीचा नसून देशाच्या पंतप्रधानांचा आहे. शासकीय नियमांनुसार आणि प्रोटोकॉलनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावणे बंधनकारक असते. कदाचित अमित ठाकरेंना या प्रोटोकॉलची माहिती नसेल किंवा ते या देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करत नसतील. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो."https://maharashtramirror.com/ Pune News

या दौऱ्यात ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’ कार्यक्रम, वाडिया कॉलेज परिसरातील सिगारेट व गुटखा विक्रीविरोधात आक्रमक भूमिका, तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा आखण्यात आला असला, तरी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरून निर्माण झालेला वादच पुण्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

महत्वाचे मुद्दे

  • ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी गेले होते
  • कँटिनमधील जेवणाचा दर्जा आणि क्रीडा कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक उपलब्ध नसण्याबाबत मुख्याध्यापकांना धरले धारेवर
  • मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते; मनसे कार्यकर्त्यांनी हा फोटो खाली उतरवला
  • राजकीय वर्तुळात उमटले तीव्र पडसाद; पुण्यातील राजकारणाला आता भाजप विरुद्ध मनसे असे नवे वळण
  • माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी आपल्या कृतीचे केले जोरदार समर्थन
  • ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, तर तो लावा पण दुसरीकडे https://maharashtramirror.com/ Pune News

  • "तो फोटो छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांच्या बाजूला चालणार नाही. भाजप नेत्यांना आमचा हा विरोध खटकत असेल, तर त्यांनी आधी जनतेला सांगावे की त्यांना शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? उद्या तुम्ही देवघरातही मोदींचा फोटो लावाल का? आम्ही छत्रपती महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही." -- अमित ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाhttps://maharashtramirror.com/ Pune News

    Share