Pimpri news : नोकरीवरून काढल्याचा राग: रुग्णवाहिका चालकाने एचआर मॅनेजरवर रोखली पिस्तूल
Pimpri news : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : कंपनीतून कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका माजी रुग्णवाहिका चालकाने एचआर मॅनेजरवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
3 min read

Pimpri news : तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
Pimpri news : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : कंपनीतून कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका माजी रुग्णवाहिका चालकाने एचआर मॅनेजरवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील सुदवडी येथील 'डिलिव्हरी लिमिटेड' कंपनीजवळील एका चहाच्या टपरीसमोर गुरुवारी (दि. १७) संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.https://maharashtramirror.com/ Pimpri news
या प्रकरणी आदेश राजकुमार दुबे (वय २६, रा. म्हाळुंगे; मूळ रा. भदोही, उत्तर प्रदेश) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, राजा उर्फ मोहम्मद नैयर मन्सुरी (वय २६, रा. वेलवडी; मूळ रा. मुझफ्फरपूर, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश हे आपल्या सहकाऱ्यासोबत चहा घेत असताना आरोपी राजा तिथे पोहोचला. जुन्या वादातून त्याने पिस्तूल कॉक करून थेट आदेश यांच्यावर रोखली.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ओला-उबरमध्ये गाडी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक
सायबर गुन्ह्यांतील पैशांसाठी वापर
बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : ओला-उबरचा व्यवसाय सुरू करून देण्याचे आमिष दाखवून बँक खाते आणि सिम कार्ड हस्तगत करत, त्याचा वापर सायबर फसवणुकीचे पैसे मागवण्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खराळवाडी परिसरात २० जुलै ते १८ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी रोहन श्रावण वाघमारे (वय २४) आणि रोहन चालक (वय २४, दोघे रा. केज, जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धम्मशील अशोक सातपुते (वय २३, रा. चिखली) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी धम्मशील यांचा विश्वास संपादन करून सीएसबी बँकेच्या पिंपरी शाखेत खाते उघडण्यास लावले. त्यानंतर पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. या खात्याचा वापर आरोपी सायबर गुन्हे आणि चोरीचे पैसे मागवून फसवणूक करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे.
ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी भाड्याने घेतली कार; ना भाडे दिले, ना गाडी परत केली
५.३१ लाख रुपयांची फसवणूक; एकावर गुन्हा
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी दरमहा ठरलेल्या भाड्यावर कार घेऊन तिचे भाडे न देता ५.३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. निघोजे येथे १ मे २०२६ पासून ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला.
या प्रकरणात विशाल लालू तपासे (वय २५, रा. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद तुळशीराम घारे (वय २५, रा. निघोजे) यांच्या तक्रारीवरून दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशालने प्रमोद यांची 'श्रेया टुअर्स अँड ट्रॅव्हल्स' नावाने नोंदणीकृत असलेली कार २४,००० रुपये प्रति महिना भाड्याने घेतली होती. ४ महिन्यांचे एकूण ९६,००० रुपये भाडे होणे अपेक्षित असताना आरोपीने केवळ ६५,००० रुपये दिले आणि ३१,००० रुपये थकवले. शिवाय त्याने ५ लाख रुपये किमतीची कारही परत केली नाही.
साईड मागितल्याच्या कारणावरून कार चालकाने बाईकला उडवले; दोघे गंभीर जखमी
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यावर पुढे जाण्यासाठी साईड मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून कार चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. गुरुवारी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी प्रतीक जगदीश कुंभकार (वय २४, रा. हिंजवडी फेज-१; मूळ रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली असून, मारुती एर्टिगा कार (एमएच १४ एलएक्स ०६९१) च्या चालकावर (नाव अज्ञात) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक आणि त्यांचा मित्र अंकित गजभिये हे दोघे ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. वाटेत त्यांनी कारचालकाला "तुम्ही आधी पुढे जा," असे सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने कार चालकाने शिवीगाळ करत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत.
पाण्याची मोटार स्विच ऑन करताच विजेचा जोरदार धक्का; खड्ड्यात उतरलेल्या कामगाराचा मृत्यू
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यातील पाणी काढण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी येथील 'श्री सीबीएनजे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या कंस्ट्रक्शन साईटवर शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता हा अपघात घडला.
या प्रकरणी मृत कामगाराचा भाऊ नीरज शिवप्रसाद आदिवासी (वय २२, रा. चाकण; मूळ रा. रीवा, मध्य प्रदेश) याने फिर्याद दिली असून, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राधेश्याम उर्फ उमाशंकर रामकरण आदिवासी (वय २९, रा. भोसरी; मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सूरज आदिवासी (वय २५) हा पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी खड्ड्यात उतरला होता. मात्र, त्याने इशारा देण्यापूर्वीच आरोपी राधेश्यामने पाण्याची मोटार चालू केली. यामुळे सूरजला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


