Pune Crime : आळंदी-मरकळ रोडवर शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
Pune Crime : पिंपरी: बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
VK
Vikrant Kulkarni
1 min read

Pune Crime : घातक शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई धुडकावली
Pune Crime : पिंपरी: बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आळंदी-मरकळ रोडवरील सोळू येथे करण्यात आली. संकेत बजरंग गंगाधरे (२०, रा. ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात घातक शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई आहे. असे असताना आरोपीने ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता स्वतःजवळ बाळगला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त केला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ pune Crime


