Skip to content

Ajit Pawar : लोकलमध्ये मृत्यूचं आमंत्रण! दिवा-मुंब्रा अपघातात सहा जणांचा बळी

Ajit Pawar On Mumbai Local Accident : अजित पवारांचा सवाल — "रेल्वेला जबाबदार धरलं पाहिजे!"

V
Vivek

1 min read

ajit pawar

Ajit Pawar On Mumbai Local Accident : अजित पवारांचा सवाल — "रेल्वेला जबाबदार धरलं पाहिजे!"

मुंबई :- मुंबईच्या लोकलची जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा काळ ठरली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये, दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या धक्कादायक अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. Ajit Pawar On Mumbai Local Accident प्रवाशांनी फूटबोर्डवर लटकत केलेल्या प्रवासात, बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या लोकलच्या घशात अनेकजण सापडले आणि ट्रॅकवर फेकले गेले. आठ जण पडलं, त्यातले सहा जागीच ठार तर दोन जखमी झाले.

राजकीय वर्तुळातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे प्रशासनावर बोट ठेवलं आहे. “ही जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे नाकारता येणार नाही. चौकशीचे आदेश निश्चितच निघाले असतील, पण ही दुर्घटना मन हेलावणारी आहे,” असं सांगताना त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

अजित पवार म्हणाले, “लोकलमध्ये प्रवासी दरवाज्यात लटकलेले असतात, पण मेट्रोप्रमाणे दरवाजे नसल्याने अशा घटना होतात. दरवाज्यात लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकींना घासल्या गेल्या आणि त्यामुळेच हा अपघात झाला.” दरम्यान, ही घटना सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र मध्य रेल्वेने त्याचा इन्कार केला आहे.

पवार यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी संपर्कात असतील आणि ते स्वतःही अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार आहेत. “मुंबईकरांचा जीव वाचवायचा असेल, तर उपाययोजना तात्काळ करणं गरजेचं आहे,” असा निर्वाळा त्यांनी दिला.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नेहमीप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असून, जखमींचा संपूर्ण खर्च रेल्वे विभाग उचलणार असल्याचेही सांगण्यात आले.

नेमकं काय झालं?

कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9.20 च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Share