Mumbai News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ऐरोलीत 1 कोटी 30 लाखांची परराज्यातील अवैध दारू जप्त!
Mumbai News :मुंबई : राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोकण विभाग, ठाणे यांच्या वतीने काल ( 11 ऑक्टोबर 2026) रोजी एक अत्यंत थरारक आणि धडक कारवाई करण्यात आली आहे.
1 min read

Mumbai News : चॉकलेट व पांढऱ्या रंगाच्या टाटा ट्रक मधून चालणारी गोवानिर्मित मद्याची तस्करी उघड; वाहनचालक जेरबंद
Mumbai News :मुंबई : राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोकण विभाग, ठाणे यांच्या वतीने काल ( 11 ऑक्टोबर 2026) रोजी एक अत्यंत थरारक आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. ऐरोली रेल्वे स्टेशनसमोर, बेलापूर-ठाणे रोड, नवी मुंबई येथे बेकायदेशीररीत्या परराज्यातील अवैध मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली असून, तब्बल 1 कोटी 30 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
तपासणी दरम्यान आढळले 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की'चे 1000 बॉक्सेस
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व पथकाने ऐरोली रेल्वे स्टेशनसमोर सापळा रचला होता. यादरम्यान चॉकलेट व पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या मॉडेल एलपीटी 3718 (बाराचाकी) ट्रकची (क्र. एमएच-10-एडब्ल्यू-5294) कसून तपासणी करण्यात आली. ट्रकच्या कॅबिनमध्ये निरमा साबणाचे बॉक्स असल्याचे सांगण्यात आले, परंतु संशय आल्याने खात्री केली असता गोव्यामध्ये निर्मिती केलेले 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की' या ब्रँडचे 180 मिली चे तब्बल 1000 बॉक्सेस (48000 बाटल्या) आढळून आले. विशेष म्हणजे, या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर किंवा कमाल किरकोळ किंमत छाटलेली नव्हती.
आरोपी चालक अटकेत; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला हा परराज्यातील विदेशी मद्याचा महासाठा जप्त करण्यात आला असून, वाहनचालक जावेदखा नवाजखा पिंजारी (वय 34, रा. गडददेव, जि. धुळे) यास घटनास्थळावरून जेरबंद करण्यात आले. परराज्यातील विदेशी मद्याच्या तस्करीसाठी वापरलेला ट्रक आणि मद्य असा मिळून एकूण 1 कोटी 30 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ए), (ई), 80,81,83,90 व 103 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील थरारक तपास दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव करत आहेत.


