Skip to content

वीज वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार करणार

महावितरण कंपनीसमोरील विविध अडचणी, तांत्रिक अडथळे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला

PG
Prashik Ghaste

1 min read

वीज वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार करणार

महावितरण कंपनीसमोरील विविध अडचणी, तांत्रिक अडथळे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

निलेश राऊत
पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांबाबत सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका यांच्या समन्वयातून एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच वीज वितरण अधिक कार्यक्षम, सुरळीत आणि विश्वासार्ह कसे करता येईल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधी एक कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे या उपस्थित होत्या तसेच आमदार शंकर जगताप,आमदार बापू पठारे, आमदार अमित गोरखे, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधित विद्युत विभागातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान महावितरण कंपनीसमोरील विविध अडचणी, तांत्रिक अडथळे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौरांनी या सर्व बाबींची सखोल माहिती घेतली व समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्यावर भर दिला. याचबरोबर नागरिकांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, हा यामागील मुख्य उद्देश असून प्रशासन सर्व स्तरावर समन्वय साधून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट आले.

Action plan to be prepared to make electricity distribution more efficient

Share