Skip to content

ACB Trap News : अपर तहसीलदारसह खासगी व्यक्तींविरुद्ध लाचखोरीचा पर्दाफाश – सापळा रचून 60 हजारांची रक्कम स्वीकृतीवेळी कारवाई

Sambhaji Nagar Bribe News : पाच फाईलच्या सुनावणीसाठी 3 लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघड

V
Vivek

1 min read

Bhiwandi Bribe News

Sambhaji Nagar Bribe News : पाच फाईलच्या सुनावणीसाठी 3 लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघड

खासगी व्यक्तींकडून रक्कम स्विकारून अपर तहसीलदारावर आरोप, दोन ताब्यात; मुख्य आरोपी पसार

छत्रपती संभाजीनगर :– तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे काम प्रलंबित ठेवून निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी अपर तहसीलदार नितीन गर्जे यांनी खासगी व्यक्तींमार्फत तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची लाच 3 lakh Bribe News मागितल्याचे प्रकरण उघड झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) सापळा कारवाईत 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी व्यक्तींना रंगेहाथ पकडण्यात आले तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. Sambhaji Nagar Latest Bribe News

तक्रारदार (वय 50 ) यांच्या नातेवाईकांच्या नावाने मिटमिटा येथे असलेल्या पाच प्लॉटची क्षेत्रदुरुस्ती संबंधित प्रकरण डिसेंबर 2024 पासून अपर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित होती. एप्रिल 2025 मध्ये सुनावणीसाठी गेलेल्या तक्रारदाराकडे खासगी व्यक्ती नितीन चव्हाण याने प्रत्येकी फाईलसाठी 60,000 रुपये या हिशोबाने एकूण 3 लाख रुपये लाचेची मागणी केली. तपासात उघड झाले की, हा प्रकार अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या प्रोत्साहनाने घडला.

यावरून लाप्रवि कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. दि. 13 व 14 मे 2025 रोजी पडताळणी दरम्यान लाचेची मागणीची पुष्टी झाली. त्यानंतर 15 मे रोजी सापळा रचून तक्रारदाराने 60,000 रुपयांची रक्कम खासगी व्यक्ती सोहेल जुबेर बहाशवान याच्याकडे सुपूर्त केली., आणि लगेचच त्याला लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली. आरोपी नितीन चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणात अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्यावर भ्र.प्र. अधिनियम 1988 चे कलम 12, तर इतर दोघांवर कलम 7अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सिटी चौक पोलीस ठाणे येथे प्रक्रिया सुरू आहे.

acb sp sandeep aatole

ही कारवाई संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद अघाव (अपर पोलीस अधीक्षक), सुरेश नाईकनवरे (उप अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी: वाल्मीक कोरे (पोलीस निरीक्षक) सहायक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे (उप अधीक्षक) यांच्या पथकाने केली आहे.

Share