Mumbai News : दिल्लीत आंदोलनापूर्वी हायव्होल्टेज ड्रामा; विमानतळावरूनच अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून अटक!'
Mumbai News :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) महाआंदोलनाला जाण्यासाठी निघालेल्या अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानातूनच ताब्यात घेतले आहे.
1 min read

Mumbai News : 30 वर्षांच्या मुलांना हे सरकार घाबरलंय; इंदिरा गांधींच्या आणीबाणीचीही आठवण काढत अभिजीत दिपकेंचा विमानातून व्हिडिओ'
Mumbai News :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) महाआंदोलनाला जाण्यासाठी निघालेल्या अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानातूनच ताब्यात घेतले आहे. आपल्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस विमानात आल्याचा दावा करत अभिजीत दिपके यांनी विमानतळावरून आणि विमानाधून एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते पोलिसांच्या कारवाईविरोधात आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news
'इंदिरा गांधींच्या आणीबाणीतही असे घडले नव्हते; 30 वर्षांची मुले सरकारला घाबरवली'
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "दिल्ली पोलीस रांगेत उभे आहेत आणि आम्हाला विमानाच्या आतूनच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ३० वर्षांच्या मुलांना हे सरकार आणि नरेंद्र मोदी इतके घाबरले आहेत की त्यांना विमानातून उचलले जात आहे. अशी दडपशाही इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीतही पाहायला मिळाली नव्हती," असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर प्रवाशांनाही नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news
अभिजीत दिपकेंसह सौरव दास आणि आशुतोष रांका अटकेत
दिल्लीतील जंतर-मंतर येथे अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यासाठी आपण जात असताना प्रशासनाकडून ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप दिपकेंनी केला. या कारवाईदरम्यान अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. “आम्हाला अटक करायची असेल तर करा, आम्ही कोणालाही घाबरत नाही,” असे म्हणत त्यांनी विमानातच 'इंकलाब जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.


