Skip to content

Pune News : अभिजीत चेस अकॅडमी बुद्धिबळ स्पर्धेत वीरेश, मार्मिक आघाडीवर

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: अभिजीत चेस अकॅडमीतर्फे आयोजित ‘मिनी ग्रुप आणि ओपन चेस टूर्नामेंट-२०२६’मध्ये सातव्या फेरीअखेर मास्टर्स गटात वीरेश शरणार्थी, तर चॅलेंजर्स गटात मार्मिक शहा यांनी प्रत्येकी ६.५ गुणांसह आघाडी कायम राखली.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

अभिजीत चेस अकॅडमी बुद्धिबळ स्पर्धेत वीरेश, मार्मिक आघाडीवर सातव्या फेरीअखेर मास्टर्समध्ये वीरेश शरणार्थीचे ६.५ गुण; चॅलेंजर्समध्ये मार्मिक शहाची आघाडी
अभिजीत चेस अकॅडमी बुद्धिबळ स्पर्धेत वीरेश, मार्मिक आघाडीवर सातव्या फेरीअखेर मास्टर्समध्ये वीरेश शरणार्थीचे ६.५ गुण; चॅलेंजर्समध्ये मार्मिक शहाची आघाडी

Pune News : सातव्या फेरीअखेर मास्टर्समध्ये वीरेश शरणार्थीचे ६.५ गुण; चॅलेंजर्समध्ये मार्मिक शहाची आघाडी

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: अभिजीत चेस अकॅडमीतर्फे आयोजित ‘मिनी ग्रुप आणि ओपन चेस टूर्नामेंट-२०२६’मध्ये सातव्या फेरीअखेर मास्टर्स गटात वीरेश शरणार्थी, तर चॅलेंजर्स गटात मार्मिक शहा यांनी प्रत्येकी ६.५ गुणांसह आघाडी कायम राखली. विविध वयोगटांतही विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ८, १०, १२ आणि १४ वर्षांखालील वयोगटांसह चॅलेंजर्स आणि मास्टर्स अशा स्वतंत्र गटांमध्ये सामने खेळविण्यात येत आहेत. १८०० किंवा त्यापेक्षा कमी गुणांकन असलेल्या खेळाडूंसाठी चॅलेंजर्स, तर १८०० पेक्षा अधिक गुणांकन असलेल्या खेळाडूंसाठी मास्टर्स गट ठेवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मास्टर्समध्ये वीरेशची आघाडी कायम

मास्टर्स गटात वीरेश शरणार्थी गेल्या दोन फेऱ्यांपासून आघाडीवर आहे. सातव्या फेरीत श्लोक शरणार्थी आणि वीरेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे वीरेशने ६.५ गुणांसह आपले अग्रस्थान कायम ठेवले, तर श्लोकच्या खात्यात ४.५ गुण झाले. चॅलेंजर्स गटात मार्मिक शहानेही आपली आघाडी कायम राखली. सातव्या फेरीत मार्मिक आणि हेयान रेड्डी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मार्मिक ६.५ गुणांसह आघाडीवर राहिला, तर हेयानचे सहा गुण झाले.https://maharashtramirror.com/ Pune News

चतुर्थी परदेशी ६.५ गुणांसह आघाडीवर

१४ वर्षांखालील गटात चतुर्थी परदेशी हिने शिवम ताम्हाणे याच्यावर विजय मिळवत ६.५ गुणांसह आघाडी घेतली. शिवमच्या खात्यात ४.५ गुण आहेत.

१२ वर्षांखालील गटात अर्णव पाटील आणि शौर्य सितप यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवत संयुक्त आघाडी घेतली. सप्तक पाल आणि अर्णव पाटील यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर शौर्यने अथर्व पंचाक्षरीचा पराभव केला.

१० वर्षांखालील गटात विहान शहा आणि चैत्रा शेठ प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. विहानने राम जोशीवर, तर चैत्राने ओवी घावटेवर विजय मिळवला.

८ वर्षांखालील गटात रिद्धेश कुलकर्णी ६.५ गुणांसह अग्रस्थानी आहे. सातव्या फेरीत अव्यय ए. जे. आणि रिद्धेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.

पालकांसाठीही विशेष मार्गदर्शन

स्पर्धेदरम्यान पालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये डॉ. मकरंद वेलणकर, बाल मानसशास्त्रज्ञ सुमित वावरे, कॅंडिडेट मास्टर सिद्धांत साळुंके यांचे वडील संतोष साळुंके, ऋषिकेश साळवेकर आणि स्पर्धा संचालक अभिजीत जोशी यांनी सहभाग घेतला. त्यांनी युवा बुद्धिबळपटूंच्या जडणघडणीत पालकांची भूमिका आणि स्पर्धात्मक खेळाबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आठव्या फेरीनंतर स्पर्धेचे अंतिम निकाल जाहीर करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

Share