Skip to content

Pune News : आळंदीतील विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल ठरली दुर्दैवी

महत्वाचे मुद्दे *सहलीमध्ये एकूण १७ मुली आणि २५ मुले सहभागी झाली *हे सर्व विद्यार्थी इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतील आहेत *काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले *मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण खोल पाण्यात ओढले गेले *स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली *बुडालेल्या आ

VK
Vikrant Kulkarni

2 min read

आळंदीतील विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल ठरली दुर्दैवी शास्त्र शाखेच्या 'विनर्स अकॅडमी' या कोचिंग क्लासची आठ मुले समुद्रात बुडून मरण पावली
आळंदीतील विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल ठरली दुर्दैवी शास्त्र शाखेच्या 'विनर्स अकॅडमी' या कोचिंग क्लासची आठ मुले समुद्रात बुडून मरण पावली

Pune News : शास्त्र शाखेच्या 'विनर्स अकॅडमी' या कोचिंग क्लासची आठ मुले समुद्रात बुडून मरण पावली

महत्वाचे मुद्दे
*सहलीमध्ये एकूण १७ मुली आणि २५ मुले सहभागी झाली
*हे सर्व विद्यार्थी इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतील आहेत
*काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले
*मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण खोल पाण्यात ओढले गेले
*स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली
*बुडालेल्या आठही जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले

Pune News : पुणे: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून खासगी कोचिंग क्लासच्या सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

आळंदी येथील विनर्स अकॅडमीची सहल दिवेआगर येथे गेली होती. या सहलीमध्ये एकूण १७ मुली आणि २५ मुले सहभागी झाली होती. त्यापैकी ८ मुले समुद्रात बुडाली. हे सर्व विद्यार्थी इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतील असल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण खोल पाण्यात ओढले गेले.

घटनेनंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. बुडालेल्या आठही जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे: यश किरण वानखेडे, ⁠सोहम तुकाराम भांडवलकर, ⁠तन्मय दत्तात्रय वाहिले, ⁠कौस्तुभ संदीप दौंड, ⁠कैवल्य वासनकर, ⁠राजवीर वहिले, ⁠प्रणव बनसोडे ⁠आणि सुमित अहिरे. घटनास्थळी पोलीस, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

'मी वाचलो पण मित्र गेले…'सहलीला गेलेल्या शिवचा पालकांना फोन

सहलीला गेलेय शिवच्या आई वडिलांनी त्याचा फोन आल्याचे सांगितले. ते म्हणाले, "समुद्रात बुडून गेलेले आठही विद्यार्थी माझ्या शिवचे चांगले मित्र होते. माझ्या शिवला शुगरचा त्रास आहे. त्याला वेळोवेळी इन्सुलिन घ्यावे लागते. त्याचे मित्र न चुकता त्याला वेळेवर औषध घ्यायला लावत होते. आज संध्याकाळी त्याचा घाबरलेल्या अवस्थेत फोन आला की माझे मित्र समुद्रात बुडाले. मी ठीक आहे पण ते आठ जण वाहून गेले. काळजात एकदम धस्स झाले. माझा शिव वाचला पण त्याचे मित्र गेले."

शिव संतोष निचंग हा विद्यार्थी अकरावी मध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण घेत आहे. तो आळंदीतील विनर अकॅडमी येथे तो क्लासला जात होता. गुरुवारी (१ ऑक्टोबर) पहाटे तीन वाजता तो आणि त्याचे क्लासमधील मित्र कोकणात सहलीसाठी गेले होते. त्यांच्या क्लासची ही सहल होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास दिवे आगर येथे पोहचल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना आणि मोठ्या बहिणीला फोन केला.

मात्र, काही वेळातच शिवच्या वडिलांच्या मोबाईलवर एका पालकाने दिवेआगर येथे समुद्रात बुडून आळंदी येथील क्लासचे आठ विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याची बातमी पाठविली. बातमी वाचून शिवच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी लगेच आपल्या मुलाला फोन लावला. मात्र, त्याचा फोन बंद लागत होता. मुलाचा फोन बंद लागल्यामुळे त्यांना अतिशय भीती वाटली. तेवढ्यात मोबाईलवर मृत विद्यार्थ्यांची नावे आली. ही नावे वाचत असतानाच शिवचा फोन आला. मी सुखरूप आहे, माझी काळजी करु नका. पण बाबा माझे मित्र बुडून गेले, असे सांगत शिवने फोनवर हंबरडा फोडला. आईवडिलांनी त्याची समजूत काढून शांत रहाण्यास सांगितले.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी शिवचे मित्र होते. त्याच्या तोंडी नेहमी यातील अनेकांचे नाव असायचे. शिवची बहिण अनेकांना ओळखत होती. या दुर्घटनेत शिव सुखरूप असला तरी त्याचे मित्र गेल्याने शिवच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share