Raighad News: मुंबई-गोवा महामार्गाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी ; रखडलेल्या कामावरून सरकारवर निशाणा
Raighad News: रायगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना महामार्गावरील अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज, दि.
1 min read

Raighad News: रायगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना महामार्गावरील अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज, दि. २६ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पेण ते नागोठणे परिसरातील रस्त्याच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.https://maharashtramirror.com/ Raighad News
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, रखडलेले सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलकांचा अभाव तसेच इतर पायाभूत सुविधांच्या समस्या असल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबई आणि राज्याच्या इतर भागांतून नागरिक कोकणाकडे रवाना होणार असल्याने या समस्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Raighad News
पाहणीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी महामार्गावरील काही ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि पुलांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. काही दिवसांपूर्वी बांधण्यात आलेला पूल बंद करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच महामार्गावरील एका बोगद्यात पाणी साचल्याने तेथे मासे दिसत असल्याचा दावा करत त्यांनी रस्ते बांधकामाच्या दर्जावरून सरकारवर टीका केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.


