Skip to content

औंध येथे सराईताकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे जप्त

४०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

PG
Prashik Ghaste

1 min read

औंध येथे सराईताकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे जप्त

४०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे: एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी बुधवारी (ता. २२) ताब्यात घेण्यात येऊन त्याच्याविरुद्ध चतृ:श्रुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

आनंद चंद्रशेखर कोळी (वय २८ वर्षे, रा. औंध) या संशयितावर सांगवी पोलीस ठाणे येथे वेगवेगळ्या कलमानुसार चार गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपोनि ढवळे व सपोफौ तारू, पोलीस अंमलदार तुपसुंदर, बोडरे, जगदाळे, शेख हे अवैध धंदे तसेच अवैध हत्यार बाळगणाऱ्यांविरुद्धच्या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने वारजे, कोथरूड, उत्तमनगर परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी अंमलदार जगदाळे, बोडरे आणि तुपसुंदर यांना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम औंध येथे गावठी कट्टा कमरेला लावून येणार आहे. बातमीप्रमाणे सदर वेळी व ठिकाणी सापळा रचून आनंद कोळी याच्या ताब्यातून एक ४०,००० रुपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित इसमाविरुद्ध चतृ:श्रुंगी पोलीस स्टेशन येथे कलम ३, २५ आर्म ऍक्ट सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३(१),(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मोहिमेत सपोनि ज्ञानेश्वर ढवळे, सपोफौ तारू, अंमलदार अमित बोडरे, तूपसुंदर, जगदाळे, शेख यांच्या पथकाने भाग घेतला अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा, युनिट ३) प्रशांत अन्नछत्रे यांनी दिली.

Share