बाणेर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू
भरधाव चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक
1 min read

भरधाव चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक
पिंपरी: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी सात वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ, प्लॅटिनम बिल्डिंगसमोर, मोहननगर, बाणेर येथे घडली.

याप्रकरणी अभिषेक राजेंद्र धुमाळ (३३, रा. कोथरूड, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईक कुणाल विश्वासराव मोहिते (वय ३८) हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने जखमीला उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पलायन केले. उपचारादरम्यान कुणाल मोहिते यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड न्युज


