Skip to content

कंपनीतील वादातून सहकाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला

कर्मचारी गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक

PG
Prashik Ghaste

1 min read

कंपनीतील वादातून सहकाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला

कर्मचारी गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक

पिंपरी: खेड तालुक्यातील निघोजे येथील संदीप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत किरकोळ वादातून एका कर्मचाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना २० मे रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कंपनी परिसरात घडली.

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

याप्रकरणी प्रवीण ज्ञानेश्वर बोबडे (वय ३४, रा. देहुगाव, मूळ रा. पिंपळखुटा, जि. यवतमाळ) यांनी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश चंद्रकांत माने (रा. बेलगाव, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही कंपनीत काम करतात. फिर्यादी कामावर उशिरा आल्याच्या कारणावरून आरोपी संतापला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या केबिनमध्ये जाऊन हातातील हातोड्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केला. या हल्ल्यात प्रवीण बोबडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Share