Skip to content

दापोडीत दोन अल्‍पवयीन बालकांना पिस्तूल बाळगल्यामुळे घेतले ताब्यात

६० हजार रुपये किमतीचे मॅग्झीनसह पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

PG
Prashik Ghaste

1 min read

दापोडीत दोन अल्‍पवयीन बालकांना पिस्तूल बाळगल्यामुळे घेतले ताब्यात

६० हजार रुपये किमतीचे मॅग्झीनसह पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी: बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन अल्‍पवयीन बालकांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मॅग्झीनसह पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (९ मे) रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास दापोडीतील काटे लॉन्स जवळील मोकळ्या जागेत करण्‍यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन संकुनहट्टे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन अल्‍पवयीन बालकांना येरवडा येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांनी ६० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि दोन राऊंड बाळगले होते. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

Share