Skip to content

हयात असताना अजित पवारांवर ७० हजार कोटींचे आरोप, आता गुणगान : उद्धव ठाकरेंचे अमित शहा यांच्यावर टीकास्त्र

अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप करण्यात आले.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

हयात असताना अजित पवारांवर ७० हजार कोटींचे आरोप, आता गुणगान
अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांचे जगणे मुश्किल करण्यात आले होते.

मुंबई, महाराष्ट्र मिरर : अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांचे जगणे मुश्किल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करताना केंद्रीय मंत्री अमित शाह हे अजित पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना शाह यांनी पुतळ्यासमोर माफी मागायला हवी होती. आम्ही तुमच्यावर केलेले आरोप खोटे होते, तुम्ही थोर होता, असे त्यांनी म्हणायला हवे होते. अजितदादा हयात असताना त्यांच्याबद्दल असे दोन शब्द बोलले असते, तर त्यांना समाधान मिळाले असते.

कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अमित शाह यांनी अनेकदा फोन केले; मात्र ठाकरे फोन उचलत नव्हते, असा दावा शाह यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना, ‘मला अमित शाह यांनी अजिबात फोन केला नव्हता. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचा उल्लेख करताना त्यांनी तत्कालीन राज्य सरकार आणि प्रशासनाचे कौतुक केले. कोरोना व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाची देशभरात दखल घेतली गेली होती; मात्र या कामाचे श्रेय संपूर्ण यंत्रणेला जाते, असेही त्यांनी नमूद केले.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper