Skip to content

सैफ अली खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल

रोहित गोदारा गँगच्या नावाने धमकी; पत्नी करीना कपूरचा उल्लेख करत दिला इशारा, पोलिसांकडून तपास सुरू

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

अभिनेता सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खान

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना गुंडांकडून धमक्यांचे सत्र सुरूच आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या धमकीनंतर आता अभिनेता सैफ अली खान यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून, त्यामध्ये सैफ अली खानला थेट गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे. ही धमकी रोहित गोदारा गँगच्या नावाने देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने काय म्हटले?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख रोहित गोदारा गँगचा सदस्य झीशान अख्तर अशी करून दिली आहे. या ऑडिओमध्ये संबंधित व्यक्ती सैफ अली खानला उद्देशून म्हणते की, 'तुझी पत्नी करीना कपूर हिने चूक केली आहे. या चुकीचे परिणाम तुला भोगावे लागू शकतात. यापूर्वी तुला चाकूने भोसकण्यात आले होते, मात्र देवाच्या कृपेने तू वाचलास. आता आम्ही तुला गोळ्या घातल्या तर तुझा शेवट बाबा सिद्दिकी यांच्यासारखा होऊ शकतो.'

या धमकीमागे खरोखरच झीशान अख्तरचा सहभाग आहे की, सेलिब्रिटींना लक्ष्य करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अन्य कोणी त्याच्या नावाचा वापर करत आहे, याचा तपास सुरू आहे. मात्र, व्हायरल ऑडिओची सत्यता आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.

धमक्यांनंतर कलाकारांकडून सुरक्षेची मागणी

बॉलिवूड कलाकारांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक कलाकारांनी विशेष सुरक्षेची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या अर्जांची मुंबई पोलिसांची संरक्षण शाखा पडताळणी करत असून, संबंधित कलाकारांना असलेल्या धोक्याचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर काही कलाकारांना 'एक्स-कॅटेगरी' सुरक्षा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror