Skip to content

सिंहगड रोडवर बीएसएनएलची २७ लाखांची कॉपर केबल चोरीला

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

सिंहगड रोडवर बीएसएनएलची २७ लाखांची कॉपर केबल चोरीला
पुणे, महाराष्ट्र मिरर : सिंहगड रोड परिसरात बीएसएनएलच्या टेलिकॉम विभागाने टेलिफोन सेवा

पुणे, महाराष्ट्र मिरर : सिंहगड रोड परिसरात बीएसएनएलच्या टेलिकॉम विभागाने टेलिफोन सेवा पुरविण्यासाठी जमिनीखाली बसविलेली सुमारे २७ लाख रुपये किमतीची कॉपर पेअर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी ४५ वर्षीय फिर्यादी (रा. कात्रज, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक, कासट कलेक्शन चौक ते ब्रह्मा हॉटेल चौक या सिंहगड रोडवरील परिसरात ही केबल टाकण्यात आली होती. १७ नोव्हेंबर २०२६ पूर्वीच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने जमिनीखालील ही केबल चोरून नेली. चोरीस गेलेल्या केबलची किंमत २७ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके पुढील तपास करीत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper