Skip to content

राहुल गांधींचा पहिल्यांदाच गर्लफ्रेंडचा उल्लेख; राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रेमकहाणीशी जोडला खास किस्सा!

आई सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधींनी सांगितली केंब्रिजमधील आठवण; 'ती आता माझी मैत्रीण आहे', उत्तराने वेधले लक्ष

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांनी आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित एक आठवण सांगितल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहेत. आई सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना राहुल गांधी यांनी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. याच आठवणीला उजाळा देताना त्यांनी पहिल्यांदाच आपल्या गर्लफ्रेंडचाही उल्लेख केला.

राहुल गांधी यांनी सांगितले की, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्या काळात राजीव गांधी केंब्रिजमध्ये शिक्षण घेत होते. याच रेस्टॉरंटशी जोडलेली एक आठवण राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात सांगितली.

केंब्रिजमध्ये शिक्षण घेत असताना राहुल गांधी यांनीही आपल्या गर्लफ्रेंडला याच रेस्टॉरंटमध्ये नेले होते. वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांची ज्या ठिकाणी पहिली भेट झाली, त्याच ठिकाणी आपणही आपल्या गर्लफ्रेंडसोबत गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.

'ती आता माझी मैत्रीण आहे'

या सोहळ्यानंतर पत्रकारांनी राहुल गांधी यांना त्यांच्या गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारला. 'आता ती गर्लफ्रेंड कुठे आहे?' असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'आता ती माझी मैत्रीण आहे.' राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आठवण सार्वजनिकपणे सांगितल्याने त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror