Skip to content

मार्केटयार्डमध्ये मॅफेड्रोन विक्रीचा पर्दाफाश; तिघांना अटक

२४.६३ ग्रॅम एमडीसह मुद्देमाल जप्त

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

मार्केटयार्डमध्ये मॅफेड्रोन विक्रीचा पर्दाफाश; तिघांना अटक
२४.६३ ग्रॅम एमडीसह मुद्देमाल जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी), मोबाईल फोन, ऑटो रिक्षा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली.

दि. १४ नोव्हेंबर रोजी अंमली पदार्थविरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गुलटेकडी येथील वारणा सहकारी बँकेच्या इमारतीजवळ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर उत्सव समिती चौक ते गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ऑटो रिक्षामध्ये तिघेजण संशयास्पदरीत्या बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ लाख १२ हजार ६०० रुपये किमतीचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन, ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, १ लाख ५० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे), बापू भिमा बाळशंकर (वय २८, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे) आणि शाहरुख मेहबूब खान (वय २८) यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper