Skip to content

मांजरीत २७ वर्षीय तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

लोखंडी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले; एकाला अटक

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

मांजरीत २७ वर्षीय तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला
लोखंडी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले; एकाला अटक

पुणे, महाराष्ट्र मिरर : मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी परिसरात एका २७ वर्षीय तरुणाला विनाकारण अडवून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास शिवशाही हॉटेलजवळ घडली.

या प्रकरणी मांजरी बुद्रुक येथील २७ वर्षीय तरुणाने मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टमधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक संतोष पात्रे (वय २२, रा. मांजरी) आणि रोहन उत्तम मांढवे (वय २२) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींनी विनाकारण फिर्यादीला मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर हातातील लोखंडी हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

रोहन मांढवे याला अटक करण्यात आली असून अभिषेक पात्रे आणि तीन अनोळखी आरोपींचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे तपास करीत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper