Skip to content

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत; स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असून देशाच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत
स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असून देशाच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत ओळख निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील आर्थिक सुधारणांचा आणि कर सवलतींचा उल्लेख केला. नागरिकांच्या हातात अधिक पैसा उपलब्ध झाल्यास बाजारपेठेतील मागणी वाढण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सूचित केले.यावेळी त्यांनी उद्योग जगतासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून कर सवलती आणि विविध आर्थिक सुधारणा केल्या जात असताना उद्योग क्षेत्राकडून वेतनवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.

देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी आणि तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. उद्योगांनी गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वदेशी उत्पादन, रोजगारवाढ आणि उद्योगांचा विस्तार या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे या भाषणातून स्पष्ट झाले.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper